Ad will apear here
Next
‘जीएसटी’विषयी गडकरींचे व्याख्यान
नितीन गडकरीनागपूर : ‘जीएसटी आणि भारतीय अर्थव्यवस्था’ या विषयावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांचे २३ जुलै रोजी नागपूर येथे व्याख्यान होणार आहे. ‘दी हितवाद’ या इंग्रजी दैनिकाने संस्थापक गोपाळ कृष्ण गोखले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे व्याख्यान आयोजित केले आहे.

या व्याख्यानात गडकरी ‘जीएसटी’तील तरतुदी समजावून सांगण्याबरोबरच जीएसटी लागू करण्याची पार्श्वभूमी विशद करणार आहेत. तसेच ते या वेळी ‘जीएसटी’बाबतच्या श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरेदेखील देतील. 

व्याख्यानासाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार असल्याने, श्रोत्यांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पंधरा मिनिटे सभागृहात उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमाविषयी :
व्याख्यान : जीएसटी आणि भारतीय अर्थव्यवस्था
दिवस : रविवार, २३ जुलै २०१७ 
वेळ :  सायंकाळी पाच वाजता
स्थळ :  डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZFIBE
Similar Posts
गडकरी यांच्या जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबीर नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ६१व्या जन्मदिनानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या शिबिरात रक्तदान करावे, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे. शिबिरातील रक्ताचे संकलन डॉ. हेडगेवार रक्तपेढीकडून करण्यात येणार आहे
‘अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य सर्वांनाच’ नागपूर : ‘विदर्भाची भूमी ही नाट्य परंपरेला दाद देणारी असून, साहित्य, संस्कार, विचार या सर्वच बाबतीत समृद्ध आहे. सहिष्णूता हा आमचा विचार आहे. संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांनाच आहे. भारतीय संविधानाने समतेचा विचार दिला असून, शासन भारतीय संविधानावरच चालत आहे; तसेच भारतीय संविधानाच्या चौकटीतच राहून
‘माझी मेट्रो देशातील सर्वाधिक ‘ग्रीन मेट्रो’ ठरेल’ नागपूर : ‘मेट्रो रेल्वेमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार असून, वाहनांचा वापर कमी झाल्याने प्रदूषण कमी होणार आहे. अधिकाधिक सौरऊर्जा प्राप्त करून देशातील अनेक मेट्रो रेल्वेंच्या तुलनेत नागपूर मेट्रो ही अधिक ‘ग्रीन मेट्रो’ अर्थात पर्यावरणपूरक मेट्रो ठरेल,’ असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला
अटल जीवनगौरव पुरस्कार मा. गो. वैद्य यांना प्रदान नागपूर : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात आलेल्या अटल सन्मानातील पहिला ‘अटल जीवनगौरव’ पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांना प्रदान करण्यात आला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language